रावेर तालुक्यात अल्पवयीन १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
सावदा ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील सावदा पोलिसस्टेशन हद्दीतील एका गावात चॉकलेट देतो असे सांगून दुकानात बोलवून १० वर्षीय लहान बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.
१ मे रोजी रात्री पावणे आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान
प्रदीप सुका कोळी याने घरी कोणी नसताना लहान मुलीस त्याच्या दुकानात बोलावून तीला चॉकलेट देत तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने सावदा पोलिसस्टेशनला तक्रार दिल्याने आरोपी प्रदीप सुका कोळी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.