मस्कावदसीम ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, दिव्यांगाच्या हस्ते फडकविला झेंडा
सावदा, ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील मस्कावदसीम ग्रामपंचायतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी दिव्यांगजनांच्या हस्ते झेंडा फडकवून त्यांचा सन्मान केला.
रावेर तालुक्यातील मस्कावदसीम ग्रामपंचायतीकडून स्वातंत्रदिनी एक स्तुत्य उपक्रम राबवीला गेला, गावातीलच दिव्यांगाचा सन्मान करत दिव्यांग व्यक्तीच्या हस्ते झेंडा फडकविला. आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील दिव्यांग व्यक्तींचा श्रीफळ आणी पुष्प देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व दिव्यांग व त्यांच्या परिवारांना घर व पाणीपट्टी करात ५०% सुट देण्यात आली .त्याप्रसंगी मस्कावदसीम च्या सरपंच सौ. सुवर्णा भोगे, उपसरपंच संजय भारंबे, सदस्य नितीन भोगे, समाधान भालेराव, राहुल फेगडे, सौ.विद्या फेगडे,सौ. स्वाती होले, सौ.कुसुम सरोदे, तलाठी अप्पा, पोलिस पाटील, सर्व ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.