भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगररावेर

शिरसाळे मारोतीच्या दर्शनासाठी जात असलेल्या दोघ युवकांवर क्रुर काळाचा घाला

सावदा/मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील सावदा येथील युवक शिरसाळे येथील मारोती च्या दर्शनासाठी जात असताना युवकाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन युवक ठार झाल्याची घटना आज शनिवारी पहाटे महामार्गावरील बोहर्डी गावाजवळ घडली. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन युवक थोडक्यात बचावले.

मिळालेली अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा येथील रहीवाशी असलेले भास्कर पांडुरंग कुंभार , लखन पंकज कुंभार, भुषण चंद्रकांत कुंभार व भुषण किशोर पुर्भी ( सर्वांचे वय – १८ ते १९ ) हे चार शालेय मित्र गेल्या चार शनिवार प्रमाणे शिरसाळे मारोती ( ता.बोदवड ) येथे दोन दुचाकीद्वारे हतनुर धरण मार्गे दि .२६. रोजी सुद्धा सकाळी दर्शनासाठी निघाले असता मात्र, मुक्ताईनगरकडे जात असतांना महामार्गावरील बोहर्डी गावाच्या अवघ्या काही अंतरावर मागील बाजूने भरवेगात येणाऱ्या अज्ञात ट्रकने भास्कर कुंभार याच्या दुचाकी क्रं. एम.एच. १९ / ८७८९ धडक दिली. यामुळे झालेल्या आवाजाने पुढील दुचाकीवर जात असलेल्या भुषण पुर्भी व भुषण चंद्रकांत कुंभार

यांनी आपली दुचाकी माघारी फिरवली असता ट्रक चालकाने त्यांनाही कट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ते थोडक्यात बचावले यावेळी चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून भरवेगात पोबारा केला, त्यांनी आपल्या अपघातग्रस्त मित्रांजवळ धाव घेऊन आक्रोश सुरु केल्याने बोहर्डी गावातील रविंद्र पाटील व निलेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जख्मींना रिक्षा व दुचाकीद्वारे वरणगांव ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र, डॉ . क्षितीजा हेंडवे यांनी भास्कर कुंभार याला मयत घोषीत करून गंभीर जख्मी लखन कुंभार याचेवर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. मात्र, त्याचाही भुसावळातील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला . घटनेची माहिती मिळताच वरणगांव पोलीस ठाण्याचे सपोनि आशिषकुमार आडसुळ व पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनीही सकाळी तातडीने घटनास्थळी धाव घेतली .

चारही मित्र शालेय विद्यार्थी असून ते सावदा येथील डि. एन . महाविद्यालयात बीए च्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होते. तर अपघातातील मयत भास्कर कुंभार हा हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे गावातीलच चहाच्या दुकानावर काम करून शिक्षण करीत होता. मात्र, क्रुर काळाने दोन्ही मित्रांवर झडप घातली. सावदा येथे या घटनेची माहीती कळताच अनेकांनी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. तर घटनेमुळे सावद्याच्या इंदिरा गांधी चौकातील कुंभार वाडा परिसरात शोककळा पसरली असून मयत भास्कर कुंभार व लखन कुंभार यांचे शवविच्छेदन केल्या नंतर यांचेवर दुपारनंतर सावदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . या घटनेबाबत भुषण पुर्भी याने दिलेल्या फिर्यादीवरून वरणगांव पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!