खिर्डी येथे अजगराने बकरी केली फस्त
खिर्डी ता.रावेर ,मंडे टू मंडे न्युज,प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी येथे गावा नजीकच भल्या मोठ्या अजगराने बकरी गिळल्याची मोठी घटना घडली.
रावेर तालुक्यातील खिर्डी- रेंभोटा शिवारात असलेल्या लोखंडी रेल्वे पुलाजवळून विवरा गावातील सांडपाणी आणि शेतशिवाराचे पाणी वाहण्यासाठी आधीपासून नाला असल्याने आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवेगार गवत झाले आहे.या ठिकाणी रेंभोटा व खिर्डी येथील पशुपालक आपली जनावरे चारण्याकरिता नेहमी येत असतात.परंतु आज दुपारी तीन ते साडे तीन वाजेच्या सुमारास खिर्डी येथील रहिवाशी राजू कोचुरे यांचे नातू दीपक तायडे हे आपल्या मित्रांसमवेत बकऱ्या चारण्यासाठी गेले होते.बकऱ्या चरत असताना अचानक नाल्यातून दहा ते पंधरा फूट लांबीचा अजगर आला आणि कळपातील पांढऱ्या रंगांच्या बकरी ला तीन चार वेटोळे मारल्यानंतर बकरी ला गिळले असे प्रत्यक्षदर्शी दीपक तायडे यांनी ‘मंडे टू मंडे न्यूज’ शी बोलताना सांगितले,दरम्यान गावा नजीकच मोठा अजगर निघाल्याने परिसरात घाबरा घबराट पसरली आहे.