ऐनपूर वि.का. सोसायटी वर शेतकरी पॅनल चे वर्चस्व, १३ पैकी १२ जागांवर विजय
ऐनपूर ता. रावेर,मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल । येथील वि.का.सह सोसायटी च्या १३ संचालक असलेल्या संचालक मडळासाठी सन 2022-2027 या पंचवार्षीक संचालक मंडळाची निवडणूक दि २० मे रोजी घेण्यात आली यात इ.मा.वर्ग प्रवर्गा मधुन मुरलीधर हरी पाटील . भटक्या जमाती प्रवर्गा मधुन ज्ञानेश्वर माधव कचरे तसेच महिला राखीव प्रवगमिधुन वृदाबाई युवराज पाटील व मिराबाई भागवत महाजन हे शेतकरी पॅनल चे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले.
कर्जदार सभासद प्रतिनिधी प्रवर्गात ८ जांगासाठी ९ उमेदवार रिंगणात होते तर अनु.जाती मतदार संघात शेतकरी पॅनल चे विकास अवसरमल व अपक्ष उमेदवार सुधीर अवसरमल यांच्यांत सरळ लढत झाली दुपारी ४ वाजे पर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली व त्यानंतर मत मोजणीस सुरुवात झाली यात कर्जदार प्रतिनिधी प्रवर्गातून शेतकरी पॅनल चे किशोर भागवत महाजन (२६१ मते), सुनिल शिवराम महाजन (२६२), कैलास काशिनाथ (२५४) . पंकज राजीव पाटील (२३३), रघुनाथ माधव पाटील .(२३०) रमेश जगन्नाथ (२३९) ‘ उमेश हरी (२२४) विकास प्रकाश पाटील(२१६) मते मिळवून विजपी झाले तरअपक्ष उमेदवार विश्वनाथ गणू पाटील यांना(१८२) मते मिळाली असून ते पराभुतझाले . तसेच अ जा मतदार संघातून शेतकरी पॅनल चे विकास वामन अवसरमल यांना(१२३) मते मिळाली त्यांचा अपक्ष उमेदवार सुधीर कडूअवसरमल यांना(१८७) मते मिळवत पराभव करून विजय प्राप्त केलाया निवडणूकीसाठी ४६५ मतदार होते या पैकी ३३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला .
निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम व्ही पावरा यांनी काम पाहिले त्यांना मतदान अधिकारी एम व्ही महाजन , एफ आय तडवी जी जी जोशी व्ही.डी वासकर तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विष्णू दोडके यांनी सहकार्य केले तसेच निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निंभोरा पो.स्टे चे स पो नि गणेश धुमाळ यांचे मार्गदर्शना खाली पो हे कॉ विलास झांबरे व पो ना . रिजवान पिंजारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे .