भारतोलन स्पर्धेत गाते येथील अमोल सुरवाडे यांना प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक
खिर्डी, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील गाते येथील रहिवाशी अमोल विनोद सुरवाडे भारत महाविद्यालय जालना येथे शिकत असलेला बिपि.एड या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतोलन, शक्तीतोलन,व शरीर सौष्ठव स्पर्धेचे आंतर महाविद्यालयीन क्रिडा महोत्सव २०२२-२३ चे आयोजन आज दिनांक १९-१२-२०२२ करण्यात आले होते.
तसेच १०९+ वजनी गटातील खेळाडू म्हणून अमोल विनोद सुरवाडे याची महाविद्यालयातर्फे निवड करण्यात आली होती. तसेच भारतोलन स्पर्धेत २१० किलो वजन उचलून प्रथम क्रमांकाने यश संपादन करून सुवर्णपदक पटकविले. उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाचे डायरेक्टर श्री.महेश राजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले आहे.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिपसाठी मोहाली येथे निवड करण्यात आलेली आहे . मार्गदर्शक म्हणून संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे क्रिडा प्रमुख निलेश गाडेकर सर, टिम कोच अलाउद्दीन तडवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.तसेच सर्व शिक्षक वृंद व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.