तासखेडा- रणगाव रस्त्यावर मोठा खड्डा,अपघाताला आमंत्रण
तासखेडा, ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज, अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील तासखेडा- रणगाव रस्त्याच्या मधोमध इंटरनेट केबलचे काम करण्यासाठी भला मोठा खडडा खोदून ठेवण्यात आला असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील तापीकाठ म्हटल्या जाणाऱ्या परिसरातील तासखेडा- रणगाव रस्त्यावर इंटरनेट केबलचे काम करण्यासाठी भला मोठा खडडा खोदून ठेवण्यात आला आहे, त्या खड्याच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे वाहन धारकांना सावधान करणारे फलक अथवा लाल रंगाचा कापड गुंडाळलेला नसुन कुठलीही अनुचित घटना या ठिकाणी घडू शकते,या रस्त्यावर नेहमी नागरिकांची वर्दळ असते,या खड्ड्या मुळे कुठल्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते संबंधित अधिकारी तिथे कोणाचा तरी अपघात होण्याची वाट तर पहात नाही ना? हा खड्डा संबंधित विभागाने अपूर्ण काम करून त्वरित बुजावा अशी मागणी परिसरातील तासखेडा, रणगाव,रायपूर,गाहूखेडा आदी गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.