भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर परिसरातही केळी पीक विम्याचे कोट्यावधी रुपये हडप, आणखी तिघांची नावे समोर

रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | केळी पीक विम्याचे कोट्यवधीं रुपये हडप केल्याच्या नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत, रावेर तालुक्यातीलच कोचुर येथील केळी पीक विम्याचे करोडो रुपये हडप केल्याचे “मंडे टू मंडे न्युज “ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यात केलेल्या आवाहनाने तालुक्याभरासह अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांचे केळीपीक विम्याचे रुपये हडप करणाऱ्याची माहिती मिळत आहे, यात रावेर तालुक्यातील शिंदखेडा -रावेर येथील कित्येक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या टोळीचे नावे समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील रावेर शहरापासून पाल रोडवर असलेल्या शिंदखेडा गावातील त्रिमूर्तीनी कित्येक शेतकऱ्यांच्या शेती उताऱ्याला पीक विम्याला लागणारे स्टॅम्प व इतर कागदपत्रांवर शेतकऱ्यांच्या बोगस कागदपत्रे जोडून कोट्यावधी रुपये हडप केले. या त्रिमूर्ती मध्ये मूळचा बऱ्हाणपूर जवळील एका गावातील व्यक्ती असून त्यांचे रावेर मार्केट मध्ये दुकान असलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. या लोकांनी परिसरातील कित्येक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये हडप केले आहेत. केळी पीक विम्याचे रुपये हडप केल्याची बोंबाबोंब झाल्याने पितळ उघडे पडू नये म्हणून काही शेतकऱ्यांना तडजोड करून रक्कम परत केल्याचीही माहिती मिळाली आहे. यात कोणकोण सामील आहेत त्यांची नावे लवकरच समोर येतील. रावेर परिसराती अशी अनेक प्रकरणे असल्याची खात्री लायक माहिती मिळाली आहे.

रावेर तालुक्यात अनेक गावांत अनेक ठिकाणी बोगस कागद पत्रे तयार करून पिकविम्याचे मोठ्याप्रमाणावर रकमा हडप केल्या आहेत, ज्या ज्या गावात केळी पीक विम्याचे रुपये हडप केले गेले त्या त्या ठिकाणची माहिती मिळत आहे, कोचुर येथील टोळीचीही माहिती मिळत आहे. आणखीही या बाबत अधिक माहिती व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून कोणाला केळी पीक विम्याच्या घोटाळ्या बद्दल माहिती असल्यास त्यांनी ९१७२३२५००३ या नंबरवर संपर्क साधावा आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल ….क्रमश: ….

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!