स्वयंपाक केला नाही! संतप्त पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला
रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। घरात स्वयंपाक केला नसल्याने पतीचा राग अनावर येऊन संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीवरचं लोखंडी रॉडने डोक्यावर वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना रावेर शहरातील महात्मा फुले चौकात घडली.
मिळालेली माहिती अशी की, रावेर शहरातील महात्मा फुले चौकातील रहिवाशी पत्नी मनीषा नंदकिशोर चौधरी हिने घरात स्वयंपाक केला नसल्याचा पती नंदकिशोर रघुनाथ चौधरी याला मोठा राग आल्याने त्याने रागाच्या भरात पत्नी मनिषाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून तिला गंभीर जखमी करत जीवघेणा हल्ला केला. या बाबत रावेर पोलिसस्टेशनला गौरव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन नंदकिशोर रघुनाथ चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि आशीष अडसुड व सचिन नवले करीत आहेत.