सावदा येथे विठ्ठल मंदिराची काकड आरती निमित्त दिंडी
सावदा, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील सावदा येथील श्री विठ्ठल मंदिर येथे कोजागिरी पौर्णिमे पासून सुरू होणाऱ्या काकड आरती निमित्त आज रमा एकादशी असल्याने काकड आरती साठी येणाऱ्या सर्व भाविकांनी दिंडी काढण्यात आली.
या दिंङी मध्ये सुरेश चौधरी, राजेंद्र चौधरी,गुणवंत चौधरी, भिमाभाऊ भारंबे, प्रमोद चौधरी,तुषार चौधरी,गोरक्ष धांङे, निलीमा चौधरी,माधुरी भंगाळे, हेमांगी चौधरी,इंदूबाई चौधरी, निर्मला चौधरी,विजया चौधरी, इंदूबाई नेमाङे,यांचे सह ४० ते ५० महिला व पुरूष उपस्थित होते तसेच काकड आरती नंतर प्रसाद वाटपात दत्तात्रय महाजन यांचे कङून केळी वाटप, व श्रीमती विजया अविनाश जावळे यांचे कङून साबुदाणा वाटप,रमेश इंगळे व टोपा महाराज कङून दूध वाटप करण्यात आले.