भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिकसामाजिक

ऐनपूर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

ऐनपुर,ता.रावेर, विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार बंडू कापसे यांच्या हस्ते झाले.

या वेळी तहसीलदार कापसे यांनी आपत्ती व तिचे प्रकार याविषयावर प्रश्न उत्तरे स्वरूपात माहिती दिली.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने होते. या कार्यशाळेच्या प्रथम भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंग रावळ यांनी लाईफ जॅकेट विषयी प्रात्यक्षिक सह माहिती दिली. नंतरच्या सत्रात डॉ प्रशांत वाघमारे यांनी आपत्ती व्यवस्थापन कसे करावे,‌त्याची कारणे याविषयीची माहिती प्रेझेन्टेशन सह सादर केली तिसऱ्या सत्रात लाईफ बोट कशी असते तिचे कार्य कशा पद्धतीने होते याविषयीची माहिती पटांगणात प्रात्यक्षिके करून दाखविले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी आपत्ती व्यवस्थापन व त्यांचे कार्य याविषयी सांगितले. या कार्यशाळेला प्रमूख पाहुणे म्हणून अप्पर तहसीलदार मा मयुर कडसे, निवासी नायब तहसीलदार मा संजय तायडे हे उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीते साठी सर्कल अधिकारी शेलकर, मा विजय सिरसाट, प्रवीण पाटील, महसूल सहाय्यक, नयना अवसरमल, अनिल आसेकर, हर्षल पाटील, श्रेयस पाटील, नितीन महाजन, गोपाल पाटील व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यशाळेचे सुत्रसंचलन हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ एस एन वैष्णव यांनी केले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!