एरंडोलक्राईम

खडके बालगृहातील अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार प्रकरण ; धक्कादायक माहिती उघड

एरंडोल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एरंडोल तालुक्यातील खडके येथील बालगृहातील अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून आता चक्क बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गुरूवारी नव्याने तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले. या मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलींनी चार महिन्यापूर्वी बाल कल्याण समिती, संस्थेचे अध्यक्ष आणि तेथील शिक्षकांकडे तक्रार केली होती. परंतू यापैकी कुणीही दखल घेतली नसल्याने या सर्वावर गुरुवारी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसात तीन अल्पवयीन पीडित मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा आरोपी गणेश पंडित याच्यासह बाल कल्याण समितीच्या बोरनारे मॅडम, देवयानी मॅडम, तळईचे शिक्षक प्रताप सर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही नावे बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार, सदस्या विद्या बोरनारे, संदीप पाटील, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादाजी उर्फ प्रभाकर यशवंत पाटील, तळई येथील शिक्षक प्रताप सर उर्फ प्रमोद पाटील अशी असून त्यांच्यावर कलम ३५४, ३७६, ३२३, ५०४, ५०६, पोस्को अंतर्गत ४,५,६,८,९, १९, २१ तसेच बाल अधिनियम ८२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी या प्रकरणात गुरूवारी एरंडोल पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी सुनिल नंदनवार, पोलीस निरीक्षक सतिश गोराडे यांनी बाल कल्याण समितीतील काही सदस्यांचे जाबजबाब घेतले. त्यानंत आरोपी गणेश पंडित यांच्यासह मुलींच्या तक्रारीची दखल घेतल्याने संस्थेचे अध्यक्ष, शिक्षक आणि बाल कल्याण समितीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खडके बुद्रुक येथील अनाथ मुलांच्या बालगृहातील पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत काळजीवाहकाने एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावरही अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणात केअरटेकर, संस्था अध्यक्ष व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.


खडके बुद्रुक येथे तळई येथील कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनाथ मुला-मुलींचे के बालगृह आहे. या बालगृहातील पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात काळजीवाहक गणेश पंडित हा पोलिस कोठडीत आहे. शनिवारी बालगृहातील ११ वर्षीय बालकानेही पंडित याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. होळीच्या दिवशी अल्पवयीन बालकाने त पाणी भरले नाही म्हणून वसतिगृहाचे काळजीवाहक गणेश पंडित याच्या सांगण्यावरून आठ विधिसंघर्षित बालकांनी पीडित बालकास लाथाबुक्क्यांनी पाठ, छाती व पोटावर मारहाण केली होती. तसेच एका रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिडीत बालक वॉशरुमला गेला असताना गणेशने त्याच्यावर शारीरिक व लैंगिक अत्याचार केला. ही घटना संस्थेच्या अध्यक्ष व शिक्षकांना सांगितली पण त्यांनीही दुर्लक्ष केले. जळगाव येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीनंतर अल्पवयीन बालकावरदेखील अत्याचार केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, गुन्ह्यातील सर्व अल्पवयीन बालकांना जळगाव येथील मुलांच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे.

पीडित बालकाच्या तक्रारीवरून काळजीवाहक गणेश पंडित, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील, सचिन प्रभाकर पाटील, भूषण प्रभाकर पाटील यांच्यासह बालगृहातील आठ अल्पवयीन बालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर पाटील यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र सचिन व भूषण फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर काळजीवाहक शिवाजी पंडित याच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!