भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

गुरूपौर्णिमा निमित्त साई देवघर येथे भाविकांची मांदियाळी

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील पूनखेडा या गावी सन १९८० यावर्षापासून पंचक्रोशीतील सर्वांना परिचित असलेले साई देवघर हे नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे.या ठिकाणी गुरू पौर्णिमे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गुरू पौर्णिमेच्या निमित्त सकाळी १०वाजेपासून ते रात्री ८वाजेपर्यंत पंचक्रोशीतील व जिल्हाभरातील भाविकांसह मध्य प्रदेश येथून ही मोठ्या संख्येने साई भक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. तसेच साई देवघर पूनखेडा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दक्षिणा घेतली जात नाही तसेच मंदिरात कुठेही दानपेटी ठेवण्यात आली नाही हे विशेष आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!