बेपत्ता वेडसर मुलाला केले वडिलांच्या स्वाधीन,निंभोरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,भीमराव कोचुरे। आज सकाळी निंभोरा पोलीस स्टे चे एपीआय मा.गणेश जी धुमाळ साहेब व एफएसआय रा.का.पाटील, पोहे.का. विकास कोल्हे व पोलीस कर्मचारी यांना गस्त करीत असतांना सिंगत गावाजवळ पावसात पूर्णतःभिजलेला व थंडीने कुडकुडत असलेला एक वेडसर इसम आढळून आला असता त्याला पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्या कडे रितसर विचारपूस करण्यात आली असता त्याने धोलकुत पोलीस स्टेशन जिल्हा बुऱ्हाणपूर येथील रहिवाशी असल्याचे सांगून त्याने मगन भिलाल असे नाव सांगितले.
निंभोरा पोलिसांनी बऱ्हाणपूर जिल्ह्यातील धोलकुत पोलिसांशी संपर्क साधून त्यांना सदर इसमाबाबत माहिती देण्यात आली असून त्याचे वडील बारसिंग भिलाल यांचेशी संपर्क साधला असता सदर तो मुलगा वेडसर असून गेल्या १५ दिवसांपासून घरून निघून गेला असल्याचे सांगितले त्यांना निंभोरा पोलीस स्टेशन येथे बोलवून योग्य ती खात्री करून आज संध्याकाळी ७वा४० मिनिटाच्या सुमारास सदर इसम मगन भिलाल यास त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.निंभोरा पोलिसांनी वडील व मुलाची भेट घालून दिल्याने निंभोरा पोलिसांनी केलेल्या कार्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.