नवजात अर्भक गटारात फेकले, रावेर तालुक्यातील धक्कादायक घटना
रावेर,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। पुरुष जातीचे नवजात अर्भक मृत अवस्थेत रावेर तालुक्यातील रसलपूर येथील एका घरासमोरील गटारीत रविवारी दि. ७ रोजी आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली .
रावेर तालुक्यातील रसलपूर येथे मशिदीकडून जाणाऱ्या रस्त्यावर विलास महाजन यांच्या घरासमोरील गटारातून दुर्गंधी येत असल्याने विलास महाजन यांनी फरशी उचलून पाहिली असता पुरुषजातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले.. हे बाळ जन्मत:च नाळेसहच गटारात फेकून देण्यात आले असल्याचे निदर्शनास आले,या बाबत माहिती त्यांनी रसलपूर येथील पोलिस पाटील प्रमोद यशवंत धनके यांना दिली त्यांनी रावेर पोलिस स्टेशनला या संदर्भात कळविले असता पोलीसानी घटना स्थळाचा पंचनामा करून मृत अर्भक रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून या बाबत रावेर पोलिसांत अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे