आपापसातील वाद सामंजसाने मिटवून कायदा-सुव्यवस्थाचे पालन करा – ना.परिक्षेत्र उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दंगलीमुळे शहराचे नावं खराब होते,आपण सर्व सुज्ञ आहात त्या मुळे दंगलीसारखे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्या ,आपापसातील वाद समन्वयाने व सामंजसाने मिटवा,व कायदा-सुव्यवस्थाचे पालन करत शहरात शांतता राखा,असे मत आज बुधवारी रावेर पोलीसस्टेशनला वार्षिक निरीक्षण निमित्त आलेल्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी रावेर पोलिसस्टेशन हद्दीतील नागरिकांशी संवाद साधत व्यक्त केले.
यावेळी त्याचे समावेत जाळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी विवेक सोनवणे उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,पद्माकर महाजन,कांता बोरा,शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन,रावेर पालिकेचे गटनेते असिफ मोहम्मद,भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी,कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील,पं. स. सदस्य योगेश पाटील,नगरसेविका शारदा चौधरी,बाळू शिरतुरे,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले.