ऐनपुर परिसरात अवैध गुटख्याची खुलेआम विक्री
ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,विजय के अवसरमल।
ऐनपूर व परिसरातील गावा मध्ये अवैध गुटख्याची खुलेआम विक्री होत असून त्यामुळे गुटख्याची विक्री करणा-या टोळ्यांनी धुमाकूळ घातला असून शासनाने प्रतिबंधित केलेल्या व मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटख्याची खुलेआम विक्री सुरु आहे जवळपास सर्वच पान टपऱ्यावर आणि हात गाड्या तसेच शाळा,महाविद्यालय परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे निदर्शनास येते.
गुटख्यावर पुर्णत बंदी घातली असतानाही ऐनपुर परिसरात सुरु असलेल्या गुटखा विक्रीमुळे तरुणाचे आरोग्य धोकात आले आहेत.राज्यात गुटखा बंदी असल्यामुळे बाहेर राज्यातून चोरट्या मार्गाने गुटख्याची आयत होत असुन यात अनेक टोळया कार्यरत आहेत विशेष बाब म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या वहनातुन सुध्दा गुटख्याची खुलेआम वाहतुक होत असल्याचे बोलले जाते, तसेच प्रत्येक दुकानात, टपऱ्यावर, मोटर सायकलवरून गुटख्याची थेटपणे पोच केली जात आहे . बाहेरील शहरातुन छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात गुटखा आणुन खुले आम विक्री सुरु आहे . गुटखा माफियाला प्रशाकीय अधिकारी याचा धाक वैगरे नाही का ? गुटखा माफीयाचे संबंधित अधिकाऱ्यांशी हप्ते बांधले असल्याचे बोलले जाते आणि म्हणूनच लाखो रुपयांचा घुटखा अवैध पणे खुलेआम विकला जात आहे. आता वरिष्ठानी याकडे लक्ष देऊन गुटख्याच्या आहारी जाणाऱ्या तरूणाईची सुटका करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत