भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

खिरोदा-पाल बोरघाटात रस्तालूट! मारहाण करून ५० हजार लूटले : पोलीस गस्त वाढवावी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पाल. ता.रावेर (सुरेश पवार):- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या पाल येथील‌ व सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले बोरघाटात दि १६/४/२०२१ रोजी रात्री १०,३०वाजता रस्त्यावर झाड आडवे टाकून थेट ३ ते ४ वाहनचालकांना जबर मारहाणी करून जवळपास ५० ते ६० हजार रुपयांची लूट १५ते २० लुटखोरांनी सामूहिकरीत्या पूर्वनियोजित कट रचुन कायद्याचा कोणताही धाक न ठेवता लूटीची घटना केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

सदरील घटनेत लिलाधर भंगाळे,जयेश भंगाळे यांना मारहाणी करून ३०हजार व २१ हजार रूपये किमतीचा एक मोबाईल आणि (एम,पी) येथील‌ एक वाहनचालक पासून ४हजार लूटून वाहन सुद्धा फोडण्यात आले असुन पाल येथील‌ कृषी विज्ञान केंद्रांचे एका वाहनचालकास अडवून त्याला मारहाणी करून ३ते ४ हजार रूपये लूटण्यात आले आहे. लूटमार करणारी टोळी जवळ, कुऱ्हाड, विळा व मोठा दुंडका असे घातक हत्यार होते सदर घटनेची नोंद १७ एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत संबंधित पोलिस ठाण्यात विचारणा केली असता झालेली नव्हती ,रात्री राजेंद्र राठोड संदीप धनगर आणि नरेंद्र बाविस्कर या पोलिस कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांचा शोध घेतला असता अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी या भागातील सर्व मोबाईल नेटवर्क यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याने बराच वेळ पोलिसांना या घटनेची माहिती मिळू शकलेली नाही असे, असले तरी नेहमी या डोंगरी व घाट परिसरात मोबाईल रेंज येत नसून यामुळे सुद्धा येथील रहिवासी नागरिक त्रस्त आहेत याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे

सदरील परिसरात रस्तालूट व दारोड्यांचे घटना घडतच राहतात असे असताना गस्ती पेट्रोलिंगच्या आभावामुळे जबरन लूट करणाऱ्यांना अधिक फावले आहे या पूर्वीचे सावदा पोलिस ठाण्याचे प्रभारी तत्कालीन अधिकाऱ्यांच्या काळात सुद्धा अशा घटना येथे घडल्या असून आज पावेतो त्यांचा कोणताच तपास लागलेला दिसत नाही आणि यात सदरच्या घटनेची भर पडलेली असून सदर रस्त्याने रात्री-बेरात्री कामानिमित्त वाहनाद्वारे ये-जा करणाऱ्यां मध्ये मोठ्याप्रमाणात भय निर्माण झालेले आहे, तरी यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी या आवाहनाला समोर जाऊन लवकरात लवकर दरोडेखोरांना अटक करावी अशी रास्त अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!