सावदा येथे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात शिवसेनेचे वृक्षारोपण
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा।। सावदा शहरातून जात असलेल्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग हा तीन राज्यांना जोडणारा महामार्ग असून एलआयसी ऑफिस पासून हॉटेल मनाली पर्यंत एक एक फूट खोल खड्डे पडलेले आहेत, तसेच नव्याने बांधलेल्या काँक्रीट रोड वरती सोडलेल्या दुभाजकांमध्ये सुद्धा खड्डे पडलेले आहे.या मध्ये मोटार सायकल घसरून रोज अपघात होत आहेत.यात मोटार सायकल चालक व मागे बसलेल्या महिला पडून किरकोळ जखमी होत आहे.
याबाबत वेळोवेळी शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्यास सूचना करून सुद्धा हा महामार्ग नॅशनल हायवे कडे वर्ग झाल्याचे सांगून दुरुस्ती साठी टाळाटाळ केली जात आहे. अशा या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या कार्यप्रणालीचा निषेध म्हणून सावदा शिवसेनेने रविवार सकाळी एलआयसी कार्यालया समोरील महामार्गातील गड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना रावेर तालुका उपप्रमुख लाला चौधरी, शहर प्रमुख भरत नेहते, शरद भारंबे, डीगंबर महाजन, शाम पाटील, हुसेन खान, सुनील राणे, मनीष उपस्थित होते.