भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

रावेर रेल्वेस्टेशन येथील रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी

रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ रावेर तालु्यातील रावेर रेल्वे स्टेशन वरील स्वस्त धान्य दुकानावर गेल्या दोन तीन महिन्यांपासून लाभधारकांना धान्य मिळाले नाही, या आधीही माल कमी आलेला आहे असे सांगून प्रत्येक लाभधारकांना दोन दोन किलो धान्य कमी दिलं.सदरचा वाद पुरवठा अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला त्यांनी रेशन दुकानदाराला समजावण्याचा प्रयत्न केला.परंतु कुठलीही कारवाई केली नाही. या आधीही यांच्या भरपूर तक्रारी असताना कारवाई का केली नाही?

ही घटना रावेर रेल्वे स्टेशन येथील असून या बाबत रेशन दुकाना संदर्भात अधिक चौकशी केली असता, गेल्या नोव्हेंबर २०२३ मध्ये कंट्रोल वाला (रेशन दुकानदार ) लाभधारकांना नोव्हेंबर मध्ये मला कमी आलेला आहे प्रत्येक रेशन धारकाला दोन किलो कमी मिळणार असे सांगून प्रत्येकी दोन दोन किलो धान्य कमी दिल्याचे सांगितले गेले.
या बाबत ज्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांना तुम्हाला जिथे जायचं तिथे जा असे सांगितले तसेच डिसेंबर मध्ये माल (धान्य) चोरी झाल्याचे सांगून, चोरांच्या नावावर टाकून देत यांनी कोणालाही धान्य वाटप केलं नसल्याची माहिती मिळत आहे.

जानेवारी २०२४ चा पण रेशन माल आला नाही असं सांगत कोणालाही धान्य दिलं नाही. मात्र दोन वेळा सर्वांचे अंगठे घेतले, जर धान्य अलच नाही तर अंगठे का घेतले ?
वरतून माल आलाच नाही व दोन दार अंगठा घेऊन घेतला.या बाबत काहींनी रेशन दुकानदाराला जाब विचारत तक्रार करण्यासाठी रावेर तहसील कार्यालयात गेले असता जानेवरीचे धान्य दिले असल्याचे सांगितले गेले.परंतु धान्य लाभधारकांना दिले नाही,तसेच फेब्रुवारी महिन्याचे धान्य सुद्धा आतापर्यंत वाटप केले नसल्याचे लभाधारकांकडून सांगण्यात आले. मग इतक आता पर्यंत न वाटप केलं गेलेलं धान्य गेले कुठे? या बाबत काही दोन चार लोकं रावेर तहसील कार्यालयात दी .२० फेब्रुवारी रोजी तक्रार करण्यासाठी गेले असता रेशन दुकानदाराने त्यांना तुम्हाला देऊन देऊ? तक्रार करू नका, विषय इथेच थांबवा,असे म्हणत बाहेरच तडजोड करण्यात आल्याची माहती मिळाली आहे.

असा प्रश्न पडतो की,बाकी रेशन दुकानदारांना रेशन धान्य लाभधारकांना वाटप करण्यासाठी मिळतो मग यांना कसा मिळाला नाही? माल कमी पाठवला कसा जातो? रेशन चा माल गेला कुठे? दरम्यान, मिळालेल्या माहिती संदर्भात रावेर पुरवठा अधिकारी डी के पाटील यांचेशी फोन वर संपर्क केला असता त्यांनी वाटप करायला सांगतो असे म्हणत वेळ मारून दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!