क्राईमचोपडा

मुद्देमालासह ६ लाख ७८ हजाराचा गुटखा जप्त,गुटखा तस्कराला अटक

चोपडा,मंडे टु मंडे न्युज. नेटवर्क/मध्यप्रदेशातुन येणा-या कीराणा माल वाहून नेणाऱ्या पिकप वाहनातून मुद्देमालासह ६,७८,००० रुपये कीमतीचा आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा पकडुन एका गुटखा तस्कर आरोपीला अटक केली आहे.

चोपडा ग्रामीण पोलीसाना दि. २१ बुधवार रोजी मध्यरात्री मध्यप्रदेशातुन येणा-या कीराणा मालाच्या पिकअप वाहनातून सेंधवा कडून धुळेकडे जाना-या चोपडा शिरपुर रोड वरील हातेड फाटा येथे बंदी असलेल्या पान मसाला आढळून आला. त्यात १,९४,४८० रु कीमतीचा विमल पान मसाला ३४,३२० रु कीमतीचे सुगधीत तबाखु व ४,५०,००० रु कीमतीची व पांढ-या रंगाची बोलेरो पिकप असा एकुण ६,७८,००० रु कीमतीचा माल चोपडा ग्रामीण पोलीसानी जप्त करून आरोपी प्रशांत मानीको भिल , रा. हेकंयवाडी ता. जि. धुळे. याला अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई चोपडा ग्रामीण पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, स.पो.नी नितनवरे, हे.पो.कॉ शंशी पारधी, पो.कॉ मनीश गावीत, पो.कॉ. सदिप निळे, यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!