पूनखेडा येथे साईबाबा मूर्ती स्थापना दिन संपन्न
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर येथून अगदी जवळ असलेल्या पूनखेडा या गावी सन १९८० पासून साई देवघर या पंच क्रोशित अगदी सर्वांना परिचित असलेले व नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे.विशेष म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दान पेटी ठेवण्यात आलेली नाही.
दर बारा वर्षांनी पंच तत्त्व भोजनाचा कार्यक्रम साई देवघर तर्फे आयोजित करण्यात येत असतो.तसेच ३१ मे मंगळवार रोजी पंच तत्त्व भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी मुंबई,नाशिक,पुणे,गुजरात, मध्यप्रदेश येथील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती अशी माहिती साई देवघर विश्वस्त विनोद कोळी यांनी मंडे टू मंडे सोबत बोलतांना माहिती दिली