लाख रुपयांची लाच घेताना लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात !
चाळीसगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : गुन्ह्यात मदत करून दोषारोपपत्र लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती १ लाख रुपयांची लाच स्वीकारणार्या मेहुणबारे पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकास एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
- सावदा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांची अहिल्यानगर येथे बदली
- सावद्यात तुफान वादळासह गारांचा पाऊस,सावदा-फैजपूर रस्त्यावर झाड कोसळले
- सहा. पोलीस निरीक्षकासह पोलिस अंमलदार १० हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात
तक्रारदारावर एक गुन्हा दाखल असून त्यात गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी तसेच हजेरी अॅडजस्ट करून तक्रारदाराला गुन्ह्यात मदत करण्यासाठी गुन्ह्यात तपास अधिकारी असलेले उपनिरीक्षक योगेश ढिकले (वय-३२) रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड, मेहुणबारे ता. चाळीसगाव यांनी गुन्ह्यात मदत करून दोषारोपपत्र लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात ४ लाख ५० हजारांची मागणी करून तडजोडीअंती १ लाख तडजोडीअंती देण्याचे ठरले होते.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने सापळा रचत गुरुवारी दोन वाजता आरोपी पोलीस निरीक्षक योगेश ढिकले याला पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच स्वीकारताच रंगेहात अटक करण्यात आली असून याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.





