भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा येथील समाज मंदिरास आदिवासी बिरसा मुंडा नाव दयावे – मा.नगरसेविका शबाना तडवी यांची मागणी

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील पालिकेच्या झालेल्या ठरावा प्रमाणे तडावी वाडा भागात बांधलेल्या तडवी समाज मंदिरास आदिवासी बिरसामुंडा सामाजिक सभागृह असे नाव देण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका शबाना तडवी आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली.

येथील नगरपरिषदेच्या दि. २२/१२/२०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ६० अन्वये तडावी वाडा भागात बांधलेल्या तडवी समाज मंदिरास आदिवासी बिरसामुंडा सामाजिक सभागृह हे नाव देण्याचा ठराव करण्यात आला होता तसेच याच सभेत ठराव क्रमांक ६८ अन्वये नगरपरिषद हद्दीत जमादार वाडा भागात बांधलेल्या समाज मंदिरास आदिवासी बिरसा मुंडा भिल हे नाव देण्यात यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर झालेला आहे

परंतु सावदा नगरपरिषदेकडून दोनही सभागृहावर नाव टाकण्यात आलेले नाही ,तरी सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार समाज मंदिरावर लवकरात लवकर नावे लावावी आशा मागणीचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी यांचे कडे देण्यात माजी नगरसेविका शबाना मुराद तडवी यांच्या कडून देण्यात आले या वेळी रमजान तडवी, मुराद शेरखाँ तडवी, नवाज रमजान तडवी, नंदा ताई लोखंडे ,सलमान जुम्मा तडवी , शाहरुख तडवी असलम तडवी समीर तडवी, आदिल तडवी, अकरम तडवी, अमीर तडवी , साहिल तडवी, साजिद तडवी, दादू तडवी , सोहेब तडवी व मुराद तडवी व नवाज तडवी मित्र परिवार उपस्थितीत होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!