सावदा येथील फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
सावदा,ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील महावीर चौकातील रहिवासी असलेला व पाणी पुरीच्या व्यवसाय करत असलेला घनशाम राजेंद्र पाटील या तरुणांचा मोर धरणावरील मोहमंडली कुऱ्हाड येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
यावल तालुक्यातील बोरखेडा मोर नदीपात्रातील परिसरात दि.१७ जुलै रोजी घनश्याम मित्रांसोबत फिरायला गेला होता तेथील रविवारी दुपारी तलावात त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात दिसेनासा झाला त्याला शोधण्याचा प्रयत्न केला असता तो मिळून आला नाही जास्त रात्री झाल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या.
शेवटी सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. यावल येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. घनशाम हा बीकॉम च्या दुसऱ्या वर्षाच्या शिक्षणासोबत पाणीपुरीचा व्यवसाय सुद्धा करीत होता. सावदा येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.