चिनावल,खिरोदा येथे एकाच रात्री सात घरफोड्या,पत्रकाराचे घरही टार्गेटवर
सावदा,त रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ परिसरात मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून शेतातील केबल वयारी सह अन्य शेती अवजारांच्या चोऱ्यांसह घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे.नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातील गौरखेडा शिवारात गौरखेडा येथील व चिनावल येथील शेतऱ्यांच्या शेतातील केबलच्या झाल्या होत्या आता पुन्हा शनिवारी रात्री चोरट्यांनी चिनावल येथील पाच बंद घरे व खिरोदा येथील दोन बंद घरे फोडून घुमाकुळ घातल्याने खळबळ उडाली आहे.
चिनावल मध्ये पाच बंद घरांना केले टार्गेट, पत्रकाराचे घरही फोडले
चिनावल मध्ये काही घरामध्ये चोरट्यांनी कपाट, लॉकर तोडत रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने यात त्यांच्या हाती काहीही लागले नाही. चिनावल येथील प्लॅट एरीयात घरमालक बाहेरगावी असल्याचा फायदा चोरट्यानी साधत बंद घरे फोडली. भर वस्तीत ही घरे फोडण्यात आल्याने रहिवासी धास्तावले आहेत, यात पत्रकार मिलिंद टोके,खेमचंद लोखंडे, मिलिंद कुरकुरे, चौधरी सह अन्य रहिवासी बाहेरगावी असल्याचे पाहून या घरांना चोरट्यानी लक्ष केले.
खिरोद्यात दोन घरांना केले टार्गेट
खिरोद्यात दोन ठिकाणी घरे फोडली खिरोदा येथील
हरी नगरातील पितांबर महाजन यांचे घरा सह आणखी ऐक घर फोडले.खिरोदा येथील हरी नगरातील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका महाजन यांच्या घराचे कुलूप कोंडे तोडून घरातून चार तोळ्याची मंगल पोत, पाच ग्रॅम कानातील झुमके, एक तोळ्याची चैन, पंचवीस हजार रुपये कॅश असा अंदाजे चार लाखांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. दुसऱ्या फोडलेल्या घरातून काय चोरीला गेले या बाबत मात्र चोरलेल्या मालाचा तपशील कळू शकला नाही. सावदा पोलीसस्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तपास यंत्रणा गतिमान केली असून ग्रामस्थांसह ग्रामपंचायत प्रशासनाला सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या तसेच बाहेरगावी गेल्यास घरात कोणत्याही मौल्यवान वस्तू ठेवू नये अशा ग्रामस्थांना सूचना केल्या.