अमळनेर गटशिक्षणाधिकारी यांच्यावरील हल्ल्याचा रावेर शिक्षक समन्वय संघटनेकडून निषेध, निवेदन
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील मार्गदर्शक बांधवांच्या व समन्वय संघटनांच्या प्रयत्नातून आज रावेर शिक्षक समन्वय संघटने तर्फे शिक्षक नेते रावसाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी अमळनेर. यांच्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक बंधू-भगिनींनी काळ्या फिती लावून कामकाज केले… तसेच तहसीलदार साहेब व BDO मॅडम यांना निषेध व कठोर कारवाई संदर्भात एकजुटीने निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी सोबत गटशिक्षणाधिकारी शैलेश दाखणे, पुंडलिक पाटील, पंकज पाटील, भूषण पाटील, निलेश पाटील, प्रकाश महाजन, संजय कोळी, उमेश दांडगे, गौस खान हाबीबूल्ला खान, विनायक चौथे, दिनेश सोनार, हरीश बोंडे, विजय पवार, दीपक सोनार, कैलास घोलाने, जितेंद्र पाटील, गोकुळ निकम सर्व केंद्रप्रमुख तथा सर्व शिक्षा अभियान कर्मचारी यांच्या सहभागामुळे आजचा निषेध व निवेदनाचा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण झाला.