तासखेडा येथिल ‘हायस्मार्ट लॅम्प’ बनले शोभेच्या वस्तू
तासखेडा,ता.रावेर. मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील तासखेडा गावामध्ये स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन.२०१८-१९ मध्ये बसवण्यात आलेले हायस्मार्ट लॅम्प( फोकस) हे गेल्या २ ते ३ महीन्या पासुन बंद अवस्थेत असुन नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. यातील एक हायस्मार्ट लॅम्प हा बस स्थानक परिसरात असुन हा सुद्धा बंद पडला असुन रात्री उशिराने येणाऱ्या- जाणाऱ्यांना तसेच रात्रीला येणाऱ्या बसच्या प्रवाश्यांना आपला जिव धोक्यात घालून अंधारातून वाट शोधावी लागत आहे.
रात्री अपरात्री बाहेर गावाहुन येनार्या लोकांना तर कळतच नाही की गावा आले म्हणुन . कारण गावचे बस स्थानकच नव्हे तर बसस्थानका जवळचा परिसर सुद्धा अंधारामुळे दिसेनासा होत आहे . गावामध्ये प्रवेश करण्यासाठी वापरला जाणारा मुख्ख रस्ता हा अंधारमय झाला असुन या बाबतची तक्रार करून देखिल यावर लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभारा विषयी तिव्र नाराजी निर्माण झाली आहे. यावर ग्रामपंचायतीने लक्ष देवून बिघडलेल्या लॅम्प ( फोकस)ची दुरुस्ती करून पसरलेले अंधाराचे साम्राज्य नष्ट करावे आशी ग्रामस्थांची मागणी आहे.