विना परवानगी गाळ वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा तहसीलदार देवगुणे यांचा इशारा
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। ग्राम विकास व जलसंधारण विभागा कडून गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार ही योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांसाठी विनामूल्य गाळ वाहतुकी साठी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.
ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या दि.६ मे २०१७ अन्वये च्या शासन निर्णयानुसार गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार ही योजना राबविण्यात येत असून रावेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना विनामूल्य शेती कामासाठी गाळ वाहतूक करावयाचा असेल त्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणीं असलेल्या ज्या पाझर तलाव, बंधारा,इत्यादी मधून गाळ काढण्यासाठी संबंधित विभागाकडून रितसर उत्खननाचे परवानगी घेतल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांचे कडून रितसर वाहतूक परवाना किंवा पास घेण्यात यावा.तसेच विना परवानगी गाळ वाहतूक करणाऱ्या वाहनांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिला आहे.