भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेरसामाजिक

‘डॉ.योगीता पॅटर्न’ प्रत्येक ठिकाणी राबवण्याची संकल्पना

रावेर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। मध्यंतरी रावेर तालुक्यातील खानापूर रेल्वे पुलाचे जवळ एक मोटर सायकल स्वार अपघातग्रस्त होऊन बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्त्यात पडलेला होता, योगायोगाने त्याच मार्गाने रावेर येथील बालरोग तज्ञ डॉक्टर योगिता पाटील व स्त्री रोग तज्ञ डॉक्टर संदीप पाटील आपल्या कारने जात होते. सदर अपघात ग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत मिळावी म्हणून त्यांनी कार थांबवून त्याच्यावर उपचार केले. सदर व्यक्ती बेशुद्ध व्यवस्थेत असल्याने त्याची कोणतीही माहिती मिळत नव्हती तरीदेखील डॉक्टर दांपत्याने आपल्या गाडीतील इमर्जन्सी किट काढून त्याच्यावर उपचार केले व त्यास जीवदान मिळाले.

या गोष्टी वर आधारित रावेर पोलीस स्टेशन तर्फे “डॉक्टर योगिता पॅटर्न”प्रत्येक ठिकाणी राबवावा ही संकल्पना समोर आली. रावेर पोलीस स्टेशनचे पी आय कैलास नागरे व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून सदर उपक्रमाला रावेर पासून सुरुवात झाली. रावेर तालुक्यातील आय एम ए, निमा व होमिओपॅथिक संघटनेच्या सर्व डॉक्टरांना एकत्रित करून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या गाडीमध्ये उपचारासाठी ठेवण्यासाठी औषधी किट वितरित केल्या. हा पॅटर्न हळूहळू जिल्हा व नंतर महाराष्ट्र स्तरावर राबविण्यात येणार आहे.

आज दिनांक 17/10/2022 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अंतुर्ली येथील मोटर सायकल स्वार रस्त्यावरील खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात असताना विवरा ते वाघोदा दरम्यान असलेल्या आशा पारेख पुलाजवळ घसरून पडले व गंभीर जखमी झाले. व त्या ठिकाणी एकच गर्दी झाली.सदर रस्त्यावरून विवरा येथील रावेर निमाचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर रवींद्र चौधरी व त्यांच्या पत्नी कारमधून जात होते, सदर अपघाता तील व्यक्ती त्यांना जमिनीवर पडलेले दिसले. डॉक्टर रवींद्र चौधरी पती- पत्नी यांनी सदर अपघातग्रस्त व्यक्तीं वर तातडीने उपचार केले त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला व पुढील उपचारांसाठी त्यांना रवाना करण्यात आले.

डॉक्टर योगिता पाटील पॅटर्न या संकल्पनेमुळे रावेर पोलीस स्टेशन मधून मला मिळालेल्याऔषधी किट मुळे मी जखमींवर त्वरित उपचार करू शकलो अशी भावना डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी व्यक्त केली. आपणही समाजाचं देणं लागतो या भावनेतून या डॉक्टर योगिता पॅटर्न या उपक्रमास सुरुवात झालेली आहे. भविष्यामध्ये गरजूंना अशाच प्रकारची सेवा उपलब्ध व्हावी म्हणून प्रत्येक डॉक्टरांच्या गाडीमध्ये अशा प्रकारच्या किट देण्यात आलेल्या आहेत.रावेर निमा अशा समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर असते. त्याचा प्रत्यय आज आपल्याला आला

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!