खिर्डी येथील “त्या” घाणीचे साम्राज्य,आरोग्य धोक्यात, वृत्ताची दाखल,साफ-सफाई सुरू
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील बलवाडी रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ कित्येक दिवसांपासून घाण कचरा पडलेला होता तसेच त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची कच्ची गटार काढण्यात आली होती परंतु सदरील गटार प्लॅस्टिक पिशव्या काडी कचऱ्यामुळे ब्लॉक झाल्याने सांडपाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्याने गटार ओव्हरफ्लो होवून दुर्गंधीयुक्त सांडपाणी येण्या जाण्याच्या मुख्य रस्त्यावर साचत असल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव येजा करावी लागत असे.
३ मार्च २०१८ मध्ये दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले परंतु गटार बांधकाम न केल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय याबाबत अनेक वेळा वॉर्ड प्रतिनिधी यांना तोंडी सांगितले परंतू त्यांनी अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.या बाबत १०जून २०२२ रोजी ” मंडे टू मंडे न्युज ” ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची ग्राम पंचायत प्रशासनाने त्वरित दखल घेतली असून सदर ठिकाणी साफसफाई चे काम सुरू करण्यात आले आहे.तसेच लवकरात लवकर नवीन गटारीचे बांधकाम करण्यात येईल अशी ग्वाही सरपंच राहुल फालक यांनी नागरिकांना दिली आहे.