रावेर येथील राजे शिवाजी चौकातील पण्याच्या व्हाल च्या कुंडात घाणीचे साम्राज्य,पालिकेचे दुर्लक्ष्य
रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। येथील राजे शिवजी महाराज चौक वार्ड क्र. 2 पाण्याचा व्हाल मध्ये खुप मोठी घाण साचलेली होती,हा प्रकार मावळा प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्याच्या लक्षात आल्याने साफ केली.
अधिक माहिती अशी की, रावेर येथील राजे शिवजी महाराज चौक वार्ड क्र. 2 मध्ये असलेल्या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या व्हाल च्या कुंडात नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर घाण साचून व्हाल चे कुंड पूर्णपणे भरलेले होते,तसेच जवळच्या काही घरात दूषित पाणी सुद्धा गेल्याचे स्थानिक नागरिकांनी मंडे टू मंडे च्या प्रतिनिधी कडे तक्रार केली,
दरम्यान ,सदरची बाब मावळा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याच्या लक्षात आल्याने त्यानी स्थानिक काही नागरिकांच्या मदतीने पाणी सोडण्याच्या व्हाल मधील कुंडातील घाण साफ केली,यात भाऊलाल सोनू शिंदे ह्या व्यक्तीने पवन शिंदे,हर्षल गायकवाड़ , श्रावण महाजन,दिपक शिंदे, राहुल महाजन ,योगेश कोळी, अल्पेश महाजन ,जायश शिंदे, गणेश मानकर याचा समावेश होता. या साचलेल्या घाण मुळे पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ पाहत होते,असाही आरोप यांनी बोलताना केला. तसेच तुकाराम महाराज मंदिरा समोर नाली खोदून ठेवली आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्यांना अडचण येत असल्याचीही तक्रार प्रतिनिधी कडे केली गेली.