खिर्डी शिवारात चोरटे सक्रीय.हजारो रुपयांच्या कापसाची चोरी
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून चंद्र प्रकाशाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी जवळपास ४ ते ५ क्विंटल कापूस चोरी केल्याची खळबळजनक घटना आज शनिवार रोजी सकाळी उघडकीस आली.
पूर्वीच अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना पावसाची उघडीपि नंतर कापूस वेचणी करण्याची लगबग सुरू असताना चंद्र प्रकाशाचा फायदा घेत खिर्डी शिवारात अज्ञात चोरट्यांचे कापूस चोरी करणारी टोळके सक्रिय झाले आहे.तसेच रब्बी पीक पेरणीचे काम सुरू असल्याने कापूस वेचनीसाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणी थांबवावी लागली आहे.परंतु वेचणी न झालेल्या शेतावर अज्ञात चोरटे पाळत ठेवून रात्रीच्या वेळेस शेतातून कापसाची सर्रासपणे चोरी करत आहे.या प्रकारामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापूस चोऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पीकसंस्था तसेच पोलिसांसमोर मात्र अज्ञात चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.