तापी परिसरात विद्युत मोटारींच्या चोरीची मालिका सुरूच; नूतन पोलीस अधिकाऱ्यांना चोरट्यांचे आव्हान !
तासखेडा – ता.रावेर, अनिल इंगळे| तापी परिसरात विद्युत मोटार चोरीच्या घटना थांबता -थांबायचे नाव घेत नाहीय,आज पुन्हा उदळी व तासखेडा शिवारातील ६ विद्युत मोटारी फोडल्या असुन चोरट्यांनी आपला दबदबा कायम ठेवत पोलीसांना पुन्हा एकदा आव्हानच देण्याचे काम केले आहे. या वेळेस मात्र चोरट्यांनी आपले ठिकाण बदलवत आता पर्यत ज्या ठिकाणी विद्युत मोटारींची चोरी झाली नव्हती त्या ठिकाणी म्हणजेच उदळी व तासखेडा शिवाराला लक्ष्य केले आहे.
- भुसावळ महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता २ हजारांची लाच घेताना रंगेहात एसीबी च्या जाळ्यात
- अवघ्या १० महिन्यांच्या निष्पाप चिमुकल्या लेकीची बादलीत पाण्यात बुडवून हत्या ; आई की राक्षसीण? मन सुन्न ! परिसर हादरला…..
- गारबर्डी धरण परिसरातील दीड लाखांच्या चोरीप्रकरणी तिघे जेरबंद
रात्री चोरट्यानी,वसंत वासुदेव पाटील( उदळी), बापु मधुकर चौधरी ( उदळी), राहुल लक्ष्मण बऱ्हाटे( उदळी), शेखर भास्कर पाटील( उदळी), ज्ञानेश्वर चुडामन चौधरी( तासखेडा), दिपक शरद ब्राम्हण( तासखेडा) या सहा शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीची चोरी केली. रात्री झालेल्या विद्युत मोटार पंपाच्या चोरीच्या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण कायम ठेवत नव्याने रुजू झालेल्या सावदा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय जालिंदर पळे यांचे जणू चोरट्यांनी चोरी करून स्वागतच केले आहे.
सतत होत असलेल्या विद्युत मोटार चोरीच्या घटना या नव्या नसुन नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे .मात्र पोलीस अधिकारी नविन आल्यामुळे सर्वाचे लक्ष साहेब काय कारवाई करतील याकडे लागले आहे.चोरट्यानी चोरी करून सावदा पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यां समोर आव्हानच उभे केले आहे.





