रावेर मध्ये विवाहितेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत विनयभंग
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर मध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या घरात घुसून विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत विनयभंग करून पीडित महिलेच्या जेठाणीला गळा कापुन चिरुन टाकीन अशी धमकी देखील पिंटू उर्फ संदीप जगन्नाथ म्हसाने याने दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की,काल १५ मे २०२२ रोजी पिंटू उर्फ संदीप जगन्नाथ म्हसाने याने ३८ वर्षीय पीडित महिला बाहेरून घरी येत असतांना तीच्या घराजवळच तिच्या मानेला हात लावुन महिलेस ईशारा केला परंतु महिलेने या कडे दुर्लक्ष करुन घरात निघुन गेली. त्यानंतर महिला व तिची सासु व जेठानी असे घरात असतांना पिंटु म्हसाने हा घरात घुसुन शिवीगाळ करू लागल्याने पीडित महिलेने त्यास घराचे बाहेर जाण्यास सांगितले असता तो एकण्याचे परिस्थितीत नसल्याने त्यास कसे तरी घरा बाहेर काढत असतांना त्याने महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करू लागला तसेच तुमचा गळा कापुन चिरुन टाकीन अशी धमकी पीडित महिलेच्या जेठानी हिस दिली. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये पिंटू उर्फ संदीप जगन्नाथ म्हसाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.