खिर्डी बु पशू वैद्यकीय दवाखान्यात अधिकारी नसल्याने पशुपालक त्रस्त
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज भिमराव कोचुरे। तालुक्यामधील खिर्डी बु.येथील श्रेणी १ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून पशू वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावराचे औषधोपचारा अभावी हाल होत आहेत. तसेच सदरील पशुवैद्यकीय दवाखाना असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच खिर्डी खु.बु, रेंभोटा,वाघाडी,पुरी, गोलवाडे, भामलवाडी,शिंगाडी इत्यादी गावांचा कारभार असलेल्या ठिकाणी. पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे हे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. या जागेवर आधी डॉ.वडजे या ठिकाणी कर्तव्यावर होते. परंतु, त्यांची बदली झाल्यामुळे ही जागा अनेक दिवसांपासून रिक्त आहे.७/८ गावांचा संपर्क येत असल्यामुळे येथे जनावरांची संख्या जास्त आहे शेतकरी वर्ग व पशुपालक अगोदरच नैसर्गिक संकटातून जात आहे. त्यामुळे पशू हे शेतकऱ्यांचे धन समजले जाते आणि याच धनावर संकट येत असल्यमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.यामुळे शेतकऱ्यांना व पशुपालकांना जनावरावर उपचार कोठे करावे, असा प्रश्र पशुपालक शेतकऱ्यांना पडला आहे. याठिकाणी सध्या परिचारक, ड्रेसर,शिपाई यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांवर येथील पशू वैद्यकीय दवाखान्याचा कारभार सुरु आहे. याठिकाणी त्वरित पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा,अशी मागणी पशू पालकांसह शेतकऱ्यांनी केली आहे.