भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर शौचालय घोटाळा : गटविकास अधिकार्‍यांची तीन तास कसून चौकशी नंतर जवाब नोंदवला

रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रावेर पंचायत समितीच्या (Raver Panchayat Samiti) शौचालय घोटाळा प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी आज सोमवारी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांची तब्बल तिन तास चौकशी करून तपास अधिका-यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रावेर पंचायत समितीच्या वैयक्तीक शौचायल योजनेत दिड कोटींचा भ्रष्ट्राचार झाल्याचे समोर आल्याने याबाबत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आठ आरोपी अटकेत असून अनेक जणांवर अटकेची टांगती तलवार आहे. सोमवारी बीडीओ दीपाली कोतवाल यांची तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली.

तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांनी यावेळी त्यांना योजना संदर्भातील विविध माहिती जाणून घेऊन गटविकास अधिकारी कोतवाल यांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!