रावेर शौचालय घोटाळा : गटविकास अधिकार्यांची तीन तास कसून चौकशी नंतर जवाब नोंदवला
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रावेर पंचायत समितीच्या (Raver Panchayat Samiti) शौचालय घोटाळा प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी आज सोमवारी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांची तब्बल तिन तास चौकशी करून तपास अधिका-यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे.
- सावदा शहराचे गॅस वितरण ‘शहरी’ वर्गीकरणात करून ४५ दिवसांची जाचक अट कमी करावी– गटनेत्या रंजना भारंबे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
- आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून गांधी चौकात जलकुंभ उभारणीच्या जागेची गटनेत्या रंजना भारंबे यांनी केली पाहणी, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना !
- अनुलोम संस्थे अंतर्गत खानापूर येथे विद्यार्थिनींसाठी महिला आरोग्य मार्गदर्शन संवाद कार्यशाळा उत्साहात
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रावेर पंचायत समितीच्या वैयक्तीक शौचायल योजनेत दिड कोटींचा भ्रष्ट्राचार झाल्याचे समोर आल्याने याबाबत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आठ आरोपी अटकेत असून अनेक जणांवर अटकेची टांगती तलवार आहे. सोमवारी बीडीओ दीपाली कोतवाल यांची तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली.
तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांनी यावेळी त्यांना योजना संदर्भातील विविध माहिती जाणून घेऊन गटविकास अधिकारी कोतवाल यांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.




