महिलेला अश्लिल शब्द बोलल्याने रावेर ला तलवारीने वार
Monday To Monday NewsNetwork।
रावेर (प्रतिनिधी)। आईला अश्लिल शब्द बोलण्याच्या कारणावरून बोलणाऱ्याला शिविगाळ करून तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना रात्री रावेरला घडली. याप्रकरणी रावेर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रावेर येथील राजू देवराम चौधरी,वय-५५ रा. संभाजीनगर, रावेर ह्यांनी पुष्पाबाई संतोष मराठे यांना अश्लिल शब्द बोलण्याच्या कारणावरून पुष्पाबाई मराठे यांचा मुलगा रविंद्र संतोष मराठे रा. संभाजीनगर रावेर याला राग आल्याने याने रागाच्या भरात राजू चौधरीवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. राजू चौधरीचा भाऊ गणेश चौधरीच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात संशयित आरोपी संतोष मराठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून
जखमी राजू चौधरी ला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे