भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर महसुल व वाळू माफीया यांचे संगमताने महसुल चोरी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर, मंडे टू मंडे वृत्तसंकलन। रावेर तालुक्यात गेल्या काही महीन्यापासुन अवैध वाळु वाहतुकी साठी परवाना हा रावेरचा ( महाराष्ट्राचा ) न दाखवता मध्यप्रदेशचा दाखवुन संबंधित अधिकाऱ्याशी संगनमत करून शासनाचा महसुल बुडविण्याचे काम सुरु आहेत. उटखेडा, प्रिपी, सुकी नदी अटवाडा, दोधा, केन्हाळा, पाल, भोकर, निभोरा या भागातील नदीतुन चोरटी वाळू वाहतुक होत आहे प्रत्येक दिवशी संधाकाळी पाच नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यन्त महसुल विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी यांच्या आशिर्वादाने प्रशासनाच्या काही सहकाऱ्यांच्या सहकार्याने व राजकिय जिल्हा परीषद, पचायत समीतीशी संबंधित काही राजकीय नेत्याचे नातेवाईक ह्याचे अवैध वाळु माफीया चोरी मध्ये धागेदोरे जुळलेले असल्याचे बोलले जाते.

यात शासनाचा मोठया प्रमाणावर महसुल बुडत असल्याने शासनाचे प्रंचड प्रमाणात नुकसान होत असुन अधिकारी व इतर सर्वाचे खिशात आर्थिक रसद जात आहे हे काम सर्व मिळून सुरु आहे. दिवसाला तालुकाभरात पाचशे ते सहाशे टॅक्टर व डंपर अवैध वाळू वाहतूक होत असते तर शनीवार, रविवार व प्रशासनाच्या सुट्टीच्या दिवशी जवळपास एक हजार अवैध वाळूचे टॅक्टर, डंपर वाहतूक करत असुन शासनाला दाखविण्या करीता कधीतरी ,केव्हातरी एखाददुसरे अवैध टॅक्टर वर कारवाई केली जाते, सपूर्ण तालुकाभर चोरटे अवैध वाळू वाहतुकीचे प्रकार बिनधास्त पणे सुरु असुन यात प्रशासनाचा करोडो रुपयाचा महसुल बुडत असुन हा प्रकार सर्वाच्या सगममताने सुरु आहे हे मात्र नक्की .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!