सावदा पोलीस स्थानकाचा कार्यभार जालींदर पळे यांच्याकडे !
सावदा ता. रावेर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : येथील एपीआय व पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस ठाण्यात कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते रात्री उशिरा सावदा पोलीस स्थानकाची धुरा सध्या एलसीबीमध्ये कार्यरत असणारे एपीआय जालींदर पळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
- भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार अमोल जावळे यांचा सत्कार
- १५ हजारांची लाच घेताना दोन पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, एकास अटक, एक फरार
- मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला,अखेर महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री
कालच सावदा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी.इंगोले व उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी आधी दाखल एका प्रकरणात आरोपींना अटक न करण्यासाठी ६० हजाराच्या लाचेच्या मागणी नंतर तडजोडीअंती १५ हजारांची लाच मागितल्याने निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही अधिकार्यांना काल सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने उचलल्याने खळबळ उडाली होती. मोठे अधिकारीच सापडल्याने सर्वांचे लक्ष लागून होते दोन्ही अधिकार्यांना दुपारच्या सुमारास अटक करत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
यामुळे दोन्ही अधिकारीच अटकल्याने त्यांच्या जागी कोण येणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. एलसीबीमध्ये कार्यरत असणारे एपीआय जालींदर पळे यांनी रात्री उशीरा आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला असून यांच्याकडे सावदा येथील प्रभार देण्यात आला आहे.