सावदा पोलीस स्थानकाचा कार्यभार जालींदर पळे यांच्याकडे !
सावदा ता. रावेर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : येथील एपीआय व पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस ठाण्यात कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते रात्री उशिरा सावदा पोलीस स्थानकाची धुरा सध्या एलसीबीमध्ये कार्यरत असणारे एपीआय जालींदर पळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
- शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! जळगावातील १३२ बोगस मान्यता रद्द; दोषी शिक्षक, संस्थाचालक व तत्कालीन मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
- यावल पालिकेत काँग्रेसला धक्का! तीन अपत्य प्रकरणी नगरसेवक शेख निसार अपात्र
- यावल मध्ये विसर्जन मिरवणुकीत नगरसेवकाला मारहाण, तर नगरसेविकेला शिवीगाळ
कालच सावदा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी.इंगोले व उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी आधी दाखल एका प्रकरणात आरोपींना अटक न करण्यासाठी ६० हजाराच्या लाचेच्या मागणी नंतर तडजोडीअंती १५ हजारांची लाच मागितल्याने निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही अधिकार्यांना काल सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने उचलल्याने खळबळ उडाली होती. मोठे अधिकारीच सापडल्याने सर्वांचे लक्ष लागून होते दोन्ही अधिकार्यांना दुपारच्या सुमारास अटक करत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
यामुळे दोन्ही अधिकारीच अटकल्याने त्यांच्या जागी कोण येणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. एलसीबीमध्ये कार्यरत असणारे एपीआय जालींदर पळे यांनी रात्री उशीरा आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला असून यांच्याकडे सावदा येथील प्रभार देण्यात आला आहे.





