युपीतील हाथरसपेक्षा बोरखेड्यातील हत्याकांड भयंकर– आ. गिरीश महाजन
रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील बोरखेडा येथील हत्याकांडाची घटना ही युपीतील हाथरस येथील घटनेपेक्षाही भयंकर असून मुलीवर शारिरीक अत्याचार केल्याचे उघडकीस आले असल्याचा आरोप माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला आहे.
अधिक असे की, तालुक्यातील बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाला आज दुपारी भेट घेतल्यानंतर आ. महाजन पत्रकारांशी बोलतांना म्हणाले अगदी रस्त्याला लागून असणार्या घरात झालेले हे हत्याकांड अतिशय दुर्दैवी असून यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर दंड करण्याची मागणी केली असून तसेच या प्रकरणात आम्ही कुठलेही राजकारण आणत नाही. परंतु, हाथरस प्रकरणापेक्षाही ही घटना भयंकर असून याची कसून सखोल चौकशी करण्याची मागणी आ.महाजन यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, भाजपा किसन मोर्चाचे सुरेश धनके, माजी जि.प उपाध्यक्ष नंदू महाजन, आदी मान्यवर होते. आ. महाजन यांनी पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.