यावलराजकीयरावेर

ब्रेकिंग : रावेरमधून खडसेच्या उमेदवारीला विरोधानंतर भाजपची सर्वेक्षण यंत्रणा पुन्हा सक्रिय !

यावल-रावेर, मंडे टू मंडे न्युज चंमु | भाजपने रावेर लोकसभा क्षेत्रातुन रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवारीला विरोध करीत संतप्त झालेल्या शेकडो पदाधिकाऱ्यानी यावल, रावेर, भुसावळ  तालुक्यातून भाजपच्या प्रदेश स्तर, जिल्हा कार्यकारणी, तालुका व शहर पातळीसह ग्रामीण भागातील शेकडो पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिले. आणि यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत असून तदनंतर गुरुवारी हे लोण बोदवड तालुक्यात पोहोचले, यानंतर चोपडा तालुक्यात कार्यकर्ते राजीनामे दिले. या पक्षांतर्गत विरोधानंतर भाजप ‘अक्शन मोड’ वर आले असून गुरुवारी दुपारनंतर लोकसभा क्षेत्रात केंद्रीयस्तरीय सर्वेक्षण सुरू झाल्यांची खात्री लायक माहिती मिळाली आहे.

पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्रानंतर पक्षाने पदाधिकारी आणि विविध जबाबदार प्रमुखां पदाधिकाऱ्यांचे नविन सर्वेक्षण केले जात आहे. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. काहींनी हे राजीनामे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवले. गुरुवारी दुसऱ्या दिवशी सुद्धा रावेर लोकसभा क्षेत्रातील तालुक्यांमधून विरोधाचे सूर उमटले होते. बोदवडच्या पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे तालुकाध्यक्षांना पाठवले. यानंतर गुरुवारी दुपारनंतर भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय स्तरावरील सर्वेक्षणाला सुरुवात केली यानंतर चोपडा येथील पदाधिाऱ्यांनीही राजीनामे दिल्याची माहिती मिळत आहे.

भाजपच्या वर्तुळात गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यमान खासदार रक्षा खडसे त्यांचे तिकिट कापले जाणार असल्याची चर्चा सुरू असतांनाच त्यांनाच पुन्हा तिकिट मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण असताना दुसरीकडे यामुळे तिकिटाचे प्रबळ दावेदार असणार्‍या विद्यमान जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या समर्थकांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. यातूनच यावल, रावेर, भुसावळ, बोदवळ, चोपडा येथील शेकडो पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले कोणत्याही स्थितीत आपण रक्षा खडसे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या पदाधिकार्‍यांनी घेतली आणि भाजपची सर्वेक्षण यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली असून सर्वेक्षणासाठी पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तीकेंद्रप्रुख, वारियर्सकड्ून महत्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेणे सुरू आहे.

जर भाजपने रावेर लोकसभेचा जाहीर केलेला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला तर अमोल जावळेंचे किंवा गिरीश महाजन यांचे नाव दिले जाण्याची चर्चा पक्षीय वर्तुळात होत आहे. अशीच परिस्थिती सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निर्माण झाली होती त्यावेळी भाजपने जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ यांना जाहीर केलेली उमेदवारी १२ दिवसानंतर बदलली होती. तर २०१४ वेळी दिवंगत खासदार हरीभाऊ जावळे यांचे तिकीट कापुन ते रक्षा खडसे यांना देण्यात आले होते. त्याची पुनरावृत्ती रावेर मतदारसंघात होईल का ? अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात चर्चिले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!