भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

ऐनपूर येथे भव्य उन्हाळी वारकरी बाल संस्कार शिबिर संपन्न

ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील ऐनपुर गावात प्रथमच वारकरी बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आज धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या मुला कडे लक्ष देयाला वेळ नाही मुले मोबाईल आणी कम्प्युटरच्या आहारी जात आहेत मुलामध्ये संस्काराची कामी भासत आहे.

आज मुले आपल्या आई वडिलां याना सुध्दामानायला तयार नाहीत किवा आपल्या सख्या भाऊ बहीणीला प्रेम द्यायाला तयार नाहीत आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या धर्मा पासुन लाबजात आहेत कित्येक मुलाना आपला धर्म ग्रंथ श्रीमद भागवत गीता आहे हे सुध्दा माहीत नाही म्हणून धर्मा पासुन संस्कारा पासुन लांब जात आहेत आणि समाजात मुले हे योगळ्या मार्गावर जात आहेत म्हाणुन ही बाब लक्षात घेऊन आपल्याऐनपुर येथील वारकरी मंडळाने सामाजिक भान राखून ऐनपुर येथे ह . भ. प . महेश महाराज . विठुमाऊलीकर ह . मु . एकलग्र यांच्या नेतृत्वाखाली ऊन्हाळी बाल संस्कार शिबिराचे आयोजन नामदेव नेमाडे यांनी केले होते . जेणेकरुण या ठीकाणी विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण तसेच गितापाठ हमुमान चालीसा तसेच ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा मृदंग आणी गायनाचे मार्गदशन करण्यत आले हे शिबिर शनिमंदिरा समोर मोहन पाटील यांच्या वाडयात घेण्यात आले या शिबिराचा लाभ गावातील सर्व बाल गोपाल व सर्व गावकरयाणी घावा असे आवाहन शिबिराचे आयोजक नामदेव नेमाडे यांनी केले .

दिनांक१२/५/२२)या रोजी शिबिराची सांगता करण्यात आले तसेच सरदार वल्लभभाई पटेल चौक व राम मदिर आणि महादेव मंदिर या सर्वठीकाणी वारकऱ्यांनी तालासुरात प्रत्येक करून दाखवला तसेच ह.भ.प बाल किर्तनकार चेतन महाराज धानोरेकर . ह भ प मोहित नेमाडे महाराज ऐनपुरकर . ह भ प नामदेव महाराज पाळधीकर . तसेच ह भ . प . महेश महाराज विठुमाऊली चिखलीकर ह.मु. एक लग्र याच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली तसेच शिबिरमध्ये शिक्षक नामदेव महाराज पाळधीकर मधुकर महाराज एकलग्रकर ललित महाराज निबोलकर आयोगक नामदेव सुपडु नेमाडे व ज्ञानेश्वर महाजन व ऐनपुर येथील समस्त ग्रामस्त मंडळी यांच्या सहभाग लाभला

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!