प्रशासनमहाराष्ट्रराष्ट्रीय

१० आणि ५०० रुपयांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय, कशा असणार नवीन नोटा? जुन्या नोटांचं काय?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १० आणि ५०० रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नोटाबंदीनंतर आरबीआयने ५०० रुपयांची लहान साईजची नोट जारी केली होती. आता पुन्हा एकदा या नोटांमध्ये बदल होणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच १० आणि ५०० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार आहे. या नोटांच्या रंग, आकार आणि डिझाइनमध्ये मोठे बदल होणार आहेत.

आरबीआयने स्पष्ट केलं आहे की, या नवीन नोटा महात्मा गांधी (नवीन) शृंखलेअंतर्गत असतील आणि त्यावर नविन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे स्वाक्षरी असतील. डिझाइनच्या दृष्टीने या नवीन नोटा सध्याच्या १० आणि ५०० रुपयांच्या नोटांप्रमाणेच असतील. म्हणजेच, काही सूक्ष्म बदल वगळता मूळ संकल्पना कायम राहणार आहे.

तसेच RBI ने जुन्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

जुन्या नोटांचं काय होणार?
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की बाजारात १० आणि ५०० च्या नवीन नोटा येणार असल्याने जुन्या नोटांचं काय होणार? मात्र, आरबीआयने स्पष्ट सांगितलं आहे की, नवीन नोटा येणार असल्या तरी, सध्या चलनात असलेल्या १० आणि ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार नाहीत. आधी जारी झालेल्या नोटाही वैधच राहणार आहेत आणि त्या नेहमीप्रमाणे बाजारात चालणार आहेत. मागच्या महिन्यातच आरबीआयने १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा आणण्याची घोषणा केली होती. आता त्यात १० आणि ५०० रुपयांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे लवकरच बाजारात तुम्हाला नव्या रूपातील नोटा दिसणार आहेत.

आरबीआयकडून असं सांगण्यात आलं आहे की, जुन्या नोटा रद्द करत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही.

कसे असेल नव्या नोटांचं स्वरूप
५०० रुपयांच्या सध्याच्या नोटा स्टोन ग्रे रंगाच्या आहेत. मात्र, आता नवीन नोटांमध्ये रंग, साईज, थीम, सिक्युरिटी फीचर्स आणि त्यांची लोकेशन यामध्ये मूलगामी बदल होणार आहेत. नवीन ५०० रुपयांच्या नोटेचा आकार ६६ x १५० मिमी असा असेल, जो आताच्या नोटेपेक्षा वेगळा असेल. नोटांचे हे नवे रूप हे फक्त चलन सुधारणा आहे, जुन्या नोटा रद्द करत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!