भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावयावलसामाजिक

न्हावी येथे बरगड्या कार्यक्रम उत्साहात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील न्हावी गावात  पारंपरिक पद्धतीने  बारागाडे उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील नागरिकांनी एकत्र येत परंपरेचा सन्मान राखत या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

उत्सवानिमित्त बारागाड्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.


या प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, मान्यवर पाहुणे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. धार्मिक विधी, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला अधिक रंगत आणली. भगत लक्ष्मण साळुंके यांनी बारा गाड्या ओढल्या. नागरिकांनी एकोप्याने आणि शांततेत उत्सव साजरा करून सामाजिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला.नन्हावीगावातील बारागाडे उत्सवाने गावाची सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच एकतेचा संदेश दिला

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!