भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

नशिराबाद मध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव ; ABC कार्यक्रम राबवण्याची मागणी

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असून काही ठिकाणी कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनाही घडत आहेत.

याबाबत नशिराबाद नगरपरिषदेस सादर करण्यात आलेल्या निवेदनात, भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या Animal Birth Control Rules 2023 नुसार, भटक्या कुत्र्यांची पकड करून त्यांची नसबंदी (स्टेरिलायझेशन) व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडणे बंधनकारक आहे.जनावरांसाठी बांधलेले. पाण्याच्या कुंडावर भटकी कुत्री पाणी पित असल्याने त्याची लाळ त्या पाण्यात मिश्रित होऊन कुंडावर पाणी पिणाऱ्या मोठी जनावरे (गाई,म्हशी तसेच बकऱ्या) यांना रेबीज हा रोग होण्याची दाट शक्यता असते.गेल्या दोन वर्षात रेबीज आजारामुळे नशिराबाद मध्ये 8 ते 10 मोठी जनावरे दगावल्याची घटना घडलेली आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, नशिराबाद शहरात ABC (Animal Birth Control) कार्यक्रम तातडीने राबवून भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणावी. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात. तसेच पाळीव कुत्र्यांनाही रेबीज प्रतिबंधक लस त्यांच्या मालकांनी देऊन घ्यावी असे विनंती पत्रक काढावे किंवा गावात दवंडी द्वारे जनजागृती करावी. सदर मागणीबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय व स्थानिक पोलिस ठाण्यासही पाठविण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!