भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

नाशिराबाद परिसरात गोवंशीय मांस विक्रीचा पर्दाफाश ; ५० किलो मांस जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | नाशिराबाद परिसरात गोवंशीय मांसाची अवैध कत्तल व विक्री प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नशिराबाद पोलीस स्टेशन येथे दाखल प्राथमिक माहितीनुसार, पोलीस कर्मचारी अतुल महाजन यांना गुप्त माहिती मिळाली की, इस्लामपुरा भागात काही जण गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करत आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यामध्ये सुमारे ५० किलो गोवंशीय सदृश मांस व एक लोखंडी कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किंमत १० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या संशयितांची नावे असलम खान उर्फ अज्जू खान (वय ३४) व उमर खान अहमद खान (वय २७, रा. नाशिराबाद) अशी असून, ते गोवंशीय मांस विक्रीसाठी कत्तल करत असल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या मांसाचा नमुना वैज्ञानिक तपासणीसाठी पाठवला असून, पुढील कारवाई सुरू आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध कत्तल प्रकरणांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!