कालपर्यंत 50 खोके एकदम ओके म्हणणारे, पवार निधी देत नाही म्हणून बंड करणारे दोघे सत्तेत बसले– संभाजीराजे
Monday To Monday News Network|
पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा| कालपर्यंत 50 खोके एकदम ओके म्हणणारे अजित पवार व राष्ट्रवादीने आमदार आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार निधी देत नाही म्हणून बंड करणारे शिंदेंचे आमदार देखील अजित पवार यांच्या मांडिला माडी लावून सत्तेत बसले आहेत. राज्यातल्या राजकारणावर स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तथा मा. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टीका केली आहे.
- मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत प्रभारी महिला सरपंच अवघ्या पाच दिवसात अपात्र …….
- मुक्ताईनगर मध्ये गावठी कट्टा सापडल्याने खळबळ, तरुणाला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- शाळेतील जबाबदार कर्मचाऱ्यानेच केला तब्बल १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोण कधी कोणासोबत जाईल याचा अंदाज सद्या लावण कठीण आहे. कालपर्यंत 50 खोके एकदम ओके म्हणणारे अजित पवार आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार निधी देत नाही म्हणून बंड करणारे शिंदेंचे आमदार देखील अजित पवार यांच्या मांडिला माडी लावून सत्तेत बसले आहेत. राज्यातल्या या घडामोडींवर स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.
संभाजीराजे म्हणाले, “मी आता कन्फ्यूज झालोय की, हे 9 मंत्री विकासाच्या नावाने ओरडायचे.. शाहू, फुले, आंबडेकर यांचे नाव घेतात आणि जातात कुठे? राज्यात विरोधीपक्ष आहे की नाही ? आपण म्हणतो जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र निर्माण करायचा. पण असा महाराष्ट्र आपल्याला हवा आहे का? असा महाराष्ट्र आपल्याला हवा आहे का? शिवसेना सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे. राष्ट्रवादी सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे. तुम्हाला हे राजकारण पटतंय का?” असा सवाल करत संभाजीराजे छत्रपती यांनी सद्याच्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे.